देवमाणूस मालिकेत येणार नवीन वळण

BIG 9 NEWS NETWORK

सध्याची चर्चेत असलेली मालिका देवमाणूस ही सत्य घटनेवर आधारीत असून बोगस डॉक्टर चे कारनामे उघडकीस आणणाऱ्या या कथेमध्ये येणार मोठा ट्विस्ट.

डॉक्टर हाच देवीसिंग आहे हे सर्वांसमोर यावं म्हणून एसीपी दिव्या सिंग पूर्ण प्रयत्न करत आहे आणि पुरावे गोळा करत आहे असं दिसून येत आहे. मालिकेचा शेवट होणार असं असं भासत असतानाच मोठे वळण येणार आहे.

किरण गायकवाड या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाने या मालिकेतील मुख्य पात्र साकारले असून सोशल मीडियावर ते प्रचंड लोकप्रिय झालेले आहे

मालिकेत आता मोठं वळण येणार असून अजित कुमार नक्की कोणती चाल खेळणार त्याचा प्लॅन काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.अजित कुमारचं खरं रूप सर्वांसमोर येण्यापूर्वी तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेत सध्या डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रेक्षकांमध्ये विशेष म्हणजे महिला वर्गामध्ये देव माणूस ही मालिका मोठ्या प्रसिद्धीस पावली आहे.

अभिनेता किरण गायकवाड या मालिकेत मुख्यभूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मालिकेतील इतर कलाकारही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे मालिका इतक्यात काही प्रेक्षकांना निरोप घेणार नाहीए.

सत्य घटनेवर आधारीत या मालिकेबद्दची प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. मालिकेसोबतच सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत.