सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहूल वैजिनाथ बोराडे (वय 36, रा.विजय देशमुख नगर,विजापूर रोड सोलापूर)
यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.कोरोनाशी दिलेली झुंज अपयशी ठरली .
कोरोना नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले.
त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते
परंतु कोरोना नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
फौजदार राहूल बोराडे हे काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते.
अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ,वहिनी असा मोठा परिवार आहे.
Leave a Reply