BIG 9 NEWS NETWORK
कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे असे वारंवार आरोग्यमंत्री सांगत असतानाही सोलापूर मध्ये मात्र लसीकरण चा तुटवडा पडत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे लोक प्रतिनिधी, आणि प्रशासन लस मिळवण्यासाठी कमी पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे आज सोमवारी शहर परिसरात लसीकरण नसल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
दोन दिवसांपासून शहरात कोरणा प्रतिबंधक लसीचा साठा आला नसल्याने सोमवारी शहरात कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाही, अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. राज्यात लसीचा पुरवठा कमी झाल्याने त्यांचे परिणाम दिसून येत आहेत. रविवारी सोलापुरात नऊशे डोस देण्यात आले. इतर दिवशीच्या तुलनेने लसीकरण संथगतीने सुरू आहे. सोमवारी लसीचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी लसीकरण सुरू होईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Leave a Reply