ओ लसवाले.! सोलापुरातील लसीकरणासंदर्भात पालकमंत्री भरणेंचे स्पष्टीकरण

सोलापुरात सध्या लसींचा तुटवडा आहे. जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद असून शहरांमध्ये 23 जून पासून लस आली नव्हती त्यानंतर मोजक्या एक-दोन दिवसांसाठी लस पुरवठा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा लस मिळत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने लसीकरण सत्र बंद असल्याची माहिती यापूर्वीच दिलेली आहे. या सर्व प्रश्नांवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.