गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार, महापौर, सभागृह नेत्यांनी घेतला गुरूंचा शुभाशीर्वाद….

BIG 9 NEWE NETWORK

सोलापूर – गुरुपौर्णिमेनिमीत्त होटगी मठ अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांना पुष्पहार घालून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला त्यानंतर शेळगी येथील गौडगावं मठामध्ये आज गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महाराज यांनी सर्वांना शुभआशिर्वाद दिले.यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख,महापौर श्रीकांचना यन्नम,, सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक राजकुमार हांचाटे, राजकुमार पाटील आदीजन उपस्थित होते.