Big9news Network
अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोणा पॉझिटिव्ह आढळताच भारत-श्रीलंका यांच्यात मंगळवारी खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला.हा सामना आज बुधवारी खेळण्यात येणार आहे.
कृणाल पांड्या सोमवारी पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर त्याला क्वारटाईन करण्यात आले. संपूर्ण संघाच्या rt-pcr चाचणीनीची प्रतीक्षा आहे.भारत-श्रीलंका यांच्यात 27 जुलै रोजी खेळला जाणारा टी-20 सामना बुधवारी खेळण्यात येणार आहे. मंगळवारी सामन्याआधी रॅपिड चाचणी घेण्यात आली, त्यात कृणाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेल्या आठ जणांची वैद्यकीय पथकाने चाचणी केली. संपूर्ण संघाचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यास सामना ठरल्यावेळेनुसार होणार आहे.
Leave a Reply