- *शहरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या तीन घटना*
- सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ
- तिन्ही घटनेत एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय
-
सोलापूर (प्रतिनिधी) शहरात दिवसाढवळ्या दि.१३ सप्टेंबर रोजी एकामागून एक तीन महिलांच्या सोनसाखळी तोडून हिसकावून चोरून नेल्याची घटना सोलापूरात घडली आहे.
पहिली घटना* जुना कुंभार नाका ते मुमताज नगर येथे सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी महानंदा मलिकार्जुन घोडके (वय-४०,रा. मु.पो.होटगी,दक्षिण सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.महानंदा घोडके या चालत किराणा दुकानाला जात असताना,मोटरसायकल वरील आलेल्या अज्ञात दोन इसमांनी पाठीमागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ,एक मंगळसूत्र,गंठण,लक्ष्मीहार असा बारा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत. -
*दुसरी घटना* सोलापूर-पुणे हायवे लगत असलेल्या गणेश नगर मडकी वस्ती येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी बबीता दिलीप आगलावे (वय-३२,रा.प्रतिक नगर,मुरारजी पेठ,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.बबीता आगलावे व त्यांचा मुलगा मोटारसायकली वरून आई-वडिलांनाकडे भेटीसाठी जात होते.त्यावेळी सोलापूर-पुणे हायवेवरील गणेश नगर मडके वस्ती येथे पाठीमागून आलेल्या दुचाकीवाहनावरील दोघा इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंडले हे करीत आहेत.या दोन्ही घटनेची माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली.
*तिसरी घटना* रुपाभवानी मंदिर ते डी मार्ट सर्विस रोड दरम्यान दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी मंजुळा तुकाराम शिंदे (वय-४३,रा. रामराज नगर,शेळगी,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.मंजुळा शिंदे या त्यांच्या मैत्रिणी सोबत दुचाकीवरून यश नगर येथे निघाले होते.रुपाभवानी मंदिर ते डी मार्ट सर्विस रोड दरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोघा इसमानपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील ५८ हजार रुपये किमतीचा पोहेहार जोरात हिसका मारून जबरदस्तीने तोडून मोटारसायकल वरून निघून गेला. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,घटनेचा तपास पोसई तळे या करित आहेत.तिन्ही घटना मध्ये एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान दिवसा ढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply