BIG 9 NEWS NETWORK
सोलापूर–सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश विसर्जनासाठी सोलापूर शहारत विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी केंद्र उभे करण्यात आले आहेत.मार्कन्डय नगर येथील जिल्हा परिषद शाळेत व माधव नगर येथील संकलन केंद्रास महापौर श्रीकांचना यन्नम व सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी भेट दिली व त्याठिकाणची पाहाणी केली.
त्या ठिकाणी व्यवस्थित पणे संकलन सुरू असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यानंतर नवले विहीर व मार्कन्डये विहीर याठिकाणी गणपती विसर्जन करण्यात येणार असून त्याची पाहाणी करण्यात आले.तरी नागरिकांनी श्रीगणेश विसर्जन आपल्या घरीच करावे शक्य नसेल तर महापालिकेच्या संकलन केंद्रात सुपुर्द करावे त्याची विधीवत विसर्जन महापालिकेकडून करण्यात येईल. नागरिकांनी असेच सहकार्य महापालिकेला करावे.यावेळी नगरसेवक श्रीनिवास करली,नवले सर,झोन अधिकारी रेगळ, सुनील बळी, बजरंग दल शहर अध्यक्ष दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply