मैं हू ना..! वृद्धपणी लग्नाचा जोडीदार शोधताय ; सोलापुरात महिलेने दिला मार्ग..

महेश हणमे,9890440480

म्हणतात ना,जोपर्यंत जोडीदार आहे तोपर्यंत त्याला सोबत द्या मृत्यूनंतर फक्त आठवणी राहतात..! परंतु दुर्दैवाने आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्या आठवणी तर सोबत आहेतच पण भावनिक ,मानसिक ,शारीरिक आधारसाठी कोणाची ना कोणाची गरज भासते. यावर सोलापुरातील एका महिलेने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक चांगला उपाय निर्माण केला आहे. याबाबत एकीकडे त्यांचे कौतुक होत असताना अनेक टीकेला सामोरे जात सक्षमतेने आपले कार्य करीत आहेत.

उन्नती विवाह संस्था या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुपाली कुंदूर- छेडा यांनी सामाजिक बांधिलकी जपून एक आगळावेगळा प्रयत्न सोलापुरात निर्माण केला आहे.
विधवा महिला, प्रौढ महिला, पुरुष ,यांच्या लग्नासाठी त्या प्रयत्न करत आहेत.वय काहीही असो तुमच्यासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास आयुष्याच्या संध्याकाळी गरजूंच्या मनात निर्माण केला आहे.

रुपाली छेडा-कुंदूर

विधवा, विधुर, घटस्फोटीत असल्यास कोणत्याही वयोगटाच्या स्त्री-पुरुषांसाठी त्यांनी वधू वर सूचक मंडळ माध्यमातून एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात एम एच 13 न्यूज सोबत संवाद साधताना रूपाली छेडा म्हणाल्या की, यासंदर्भात कार्य सुरू करत असताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. अजूनही अनेकांची मानसिकता याबाबत चांगली नाही. अनेक टीकाटिप्पणी ला सामोरे जावे लागते. एखाद्या विधवेला समाजात जगताना काय त्रास होतो याची जाणीव अनेकांना आहे पण समोर येऊन कोणी बोलत नाही. आज मी सक्षमतेने सामोरे जाते, प्रत्येक व्यक्तीस सामोरे जाईलच असे नाही.

मानसिक आधाराची खूप गरज असते, आज समाजामध्ये अजूनही असे विवाह ,विधवा विवाह करण्यास विरोध होत आहे. परंतु ज्यांना कुणाला लग्न करायचे आहे, तर संपर्क करावा,
वय काहीही असो तुमच्यासाठी मी प्रयत्न करेन्,
तुम्हाला नव्याने जगण्यासाठी स्वप्न साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विधवा किंवा विधूर असेल तर त्यांनी नवरा अथवा बायकोचा मृत्यू दाखला द्यावा. घटस्फोटित असतील तर त्यांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्र द्यावीत, अपत्य असतील तर त्याचे डिटेल्स द्यावे,
सध्या माझ्याकडे 59 वर्षाचे गृहस्थांना लग्न करायचे आहे त्यांचे स्वतःचे घर आहे, पेन्शन आहे ,त्यांची पत्नी वारली आहे,त्यांना आधाराची गरज आहे, तरी कोणी इच्छुक महिला असतील तर मला संपर्क करू शकता असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रुपाली कुंदूर छेडा
8329158232