FIRST IN INDIA | ‘इलेक्ट्रिक बस’चे ठाकरे सरकारसमोर प्रिसिजनचे सादरीकरण…

MH13 NEWS NETWORK
प्रिसिजन समूहाने नुकतीच भारतातील पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे.सोलापुरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.इंधनाच्या वाढत्या किंमती,वाढणारे प्रदूषण ,ग्लोबल वार्मिंग आणि काळाची पावले ओळखून रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची गरज असणार आहे .त्याच त्याच पार्श्वभूमीवर समूहाचे सर्वेसर्वा यतीन शहा यांनी
आज राज्य शासनासमोर आपल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचं सादरीकरण केलं.
मुंबईतील सह्याद्री शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार,  परिवहनमंत्री ना. अनिल परब, पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक श्री. संजय पांडे, परिवहन सचिव श्री. आशिषकुमार सिंग, परिवहन आयुक्त श्री. अविनाश ढाकणे हे उपस्थित होते.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन श्री. यतिन शहा व कार्यकारी संचालक करण शहा यांनी सर्वांना भारतातील पहिल्या मध्यम आकाराच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बसची फिल्मही दाखविण्यात आली. राज्य शासनाने प्रिसिजन समूहाच्या या बसचं व रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचं कौतुक केलं.
असा केला पाठपुरावा…
प्रिसिजन समूहाने नुकतीच भारतातील पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. याबद्दल 8 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा यांनी त्यांना इलेक्ट्रिक बसविषयी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी नेते संतोष पवार उपस्थित होते.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन श्री. यतिन शहा व कार्यकारी संचालक श्री. करण शहा यांनी 13 ऑक्टोबर रोजी  मुंबई येथे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  खा. शरद पवार साहेबांची भेट घेतली. प्रिसिजन समूहाने बनविलेल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर आज सह्याद्री शासकीय विश्रामगृहात सादरीकरण करण्यात आलं