Big9news Network
वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेले वस्त्रोद्योग 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्प प्रकल्पांनी सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या दिनांक 22 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयानुसार वीज सवलत मागणीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांनी केले आहे.
ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत सुरु असेल किंवा बंद आहे अथवा वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे त्या उद्योगांनी सहकार पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयनुसार प्रस्ताव आयुक्त वस्त्रोद्योग यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. सदर प्रस्तावात मागील 6 महिण्यांचे वीज देयक तसेच प्रकल्पाचा एकूण वीज वापर यामध्ये औद्योगिक, कामगार वसाहत, त्यांचे कार्यालय व अन्य वापर यांच्या माहिती तसेच त्यासाठीच्या वीज मिटर याची माहिती देखील सादर करावी.
ज्या वस्त्रोद्योग घटकांची वीज सवलत नियमित सुरु आहे त्या प्रकल्पांना वरीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यासाठी शासन निर्णयानुसार 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. सदर प्रकल्पांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पर्यत प्रस्ताव सादर करावेत. या मुदतीत ज्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त होणार नाहीत त्यांची वीज सवलत बंद करण्यात येईल. तसेचा सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावांची सखोल तपासणी केल्यानंतर शासनाच्या मान्यतेने सदर प्रकल्पांना वीज लागू करण्यात येईल.
शासन निर्णयात दिलेल्या सुचनानुसार शासनास प्राप्त होणाऱ्या वीज सवलतींच्या प्रस्तावात प्रकल्पांनी सादर केलेली माहिती तसेच प्रकल्पात प्रत्यक्षात असलेली माहिती तीच आहे किंवा कसे याची विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडुन नियमित तपासणी करण्यात येईल. जर पथकाच्या तपासणीत निदर्शनात आले की, प्रकल्पाने सादर केलेली माहिती तसेच प्रत्यक्षात असलेली माहिती यामध्ये तफावत आहे किंवा प्रकल्पाने चुकीची अथवा खोटी माहिती सादर केली आहे, तर त्या प्रकल्पाची वीज सवलत तसेच अन्य सवलती तात्काळ बंद करण्यात येतील. तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व अनुदानाची व्याजासह वसूली करण्यात येईल असेही वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती तेली- उगले यांनी कळविले आहे.
ज्या प्रकल्पांनी माहिती यापुर्वी सादर केलेली आहे, ती माहिती वगळून उर्वरित माहिती सादर करावी. तसेच ज्या प्रकल्पांनी वीज सवलत स्वघोषणापत्र न सादर केल्यामुळे बंद आहे. व त्यांनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत त्यांनी देखील त्वरीत प्रस्ताव सादर करावे.असे आवाहनही वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Leave a Reply