‘चिमणी’ | कनेक्शन तोडून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करा

Big9news Network

महापालिका सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामाची कारवाई हाती घेत आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवार, दि. २४ नोव्हेंबरपासून कारखाना परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा, प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिमणी आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाची जोडणी तोडावी, असे पत्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी पाठविले.

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास अडथळा ठरलेली चिमणी पाडण्यास नगरविकास खात्याने मागील आठवड्यात हिरवा कंदील दिला. पालिकेच्या नगररचना कार्यालयाने १७ नोव्हेंबर रोजी कारखान्याला सात दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत बुधवारी संपणार आहे. यादरम्यान पालिकेने पाडकामाची कारवाई हाती घेतली. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांना सोमवारी पत्र पाठविले. महापालिकेने सिध्देश्वर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडण्यासाठी बंगळुरू येथील बिनियास कॉन्टेट कंपनीला कंत्राट दिले आहे. विविध न्यायालये, एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार घेतली आहे. ही कारवाई हाती

यापूर्वी ११ ऑगस्ट २०१७ रोजी पालिकेचे लोक चिमणी पाडण्यासाठी गेले असता, कारखान्याचे सभासद, नागरिक अशा २५० ते ३०० लोकांनी कामास अडथळा केला. जमावातील लोकांना चिथावणी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. चिमणीवर चढून आत्महत्या करण्याच्या घोषणा दिल्या. ही पार्श्वभूमीवर विचारात घेता, कारखाना परिसर २४ नोव्हेंबरपासून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा. कामाच्या ठिकाणी नागरिक, सभासद, पदाधिकारी यांनी हरकत घेऊ नये, यासाठी बंदोबस्त नेमण्यात यावा.