Big9news Network
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत शहरात नव्याने 6 रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत घट होत आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये केवळ १० रुग्ण आढळून आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी एकूण ६१७ चाचण्या केल्या. यातून सहा रुग्ण आढळून आले. अद्यापही २१ जण रुग्णालयात आहेत. शहरात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचा दावा आरोग्य -विभागाने केला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी एकूण १ हजार ३ चाचण्या केल्या. यात १० रुग्ण आढळून आले.
हे रुग्ण खालील प्रमाणे –
- बार्शी – 2
- माढा – २
- माळशिरस – 2
- पंढरपूर – 3
(यामध्ये म्युकरमायकोसीसचा एक रुग्ण आहे.)
अशाप्रकारे रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यात नव्याने एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या १५ जणांना घरी सोडण्यात आले. आणखी ११२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Leave a Reply