Big9news Network
दरवर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिन साजरा करण्यात येतो. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील कै. मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे मूक-बधिर मतिमंद व अस्थिव्यंग निवासी शाळा यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. डोळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित असलेल्या शिक्षकांनी दिव्यांग कायदा २०१६ चे वाचन केले.
दिव्यांगाच्या सर्वागीण विकास, समावेशित शिक्षण व शिघ्र निदान व उपचार या विषयी माहिती देण्यात आली. याच वेळी दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जावून कोरोनाचे नियम पाळून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घेण्यात आली.
दिव्यांगाच्या पालकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिव्यांगत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय, शासकीय सवलती यांविषयी जनजागृती करण्यात आली. जनजागृती प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सूत्रसंचालन श्री.एम.बी.मांढरे यांनी केले. आभार श्री.एन एस दळवी यांनी मानले. संस्थेचे सचिव श्री. श्रीमंत एस. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दिव्यांगांच्या विविध स्पर्धा जसे की रांगोळी, भरतकाम चित्रकला ,निबंध स्पर्धा गरजेचे आहे; शासनाच्या विविध योजना, सवलतीची माहिती विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या परिवाराला मिळणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशालेत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
श्रीमंत म्हेत्रे
सचिव
Leave a Reply