Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big9news Network

होटगी रोड मुलतानी बेकरी जवळील क्लब नाईन या रेस्टोबार मध्ये चालणा-या अवैध जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला.जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील यांचेसह एकूण २८ इसमांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नूतन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी बजावली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके हे त्यांचे पथकासह शहरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर हद्दीतील मजरेवाडी, आसरा चौक ते होटगीकडे जाणाऱ्या रोडवरील मुलतानी बेकरी समोरील क्लब नाईन रेस्टोबार सोलापूर या ठिकाणी असलेल्या क्लबचे पहिल्या मजल्यावर माजी आमदार रविकांत पाटील हे लोकांना बसण्याची व्यवस्था करून देऊन पैशांवर पैज लावुन जुगार खेळवीत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती.

असा टाकला छापा

इमारतीचे पहिल्या मजल्यावर सिध्दाराम प्रभाकर मेरू (वय ४५ वर्षे व्यवसाय नोकरी रा.मु.पो. तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर,) ०२) आप्पालाल राजेभाई खुरूसे (वय ४२ वर्षे व्यवसाय शेती रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, ०३) सिध्दाराम महादेव मदने वय ४५ वर्षे व्यवसाय शेती रा. पुळुज वाडी ता. पंढरपूर जि. सोलापूर, ०४ ) दत्तात्रय साधू सरवळे वय ५० वर्षे व्यवसाय शेती रा.मु. पो. घोडेश्वर ता. मोहोळ जि. सोलापूर, (०५) सोमनाथ सिध्दाराम पटणे वय ३३ वर्षे व्यवसाय शेती रा. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ०६)शरफोद्दीन आल्लाउदीन जमादार वय ४१ वर्षे व्यवसाय मजुरी रा.मु.संगदारी, पो. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर, ०७) सुर्यकांत नरहरी जाधव वय-३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. शहापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद, ०८) विष्णु भाऊसाहेब पवार वय ४५ वर्षे व्यवसाय शेती रा. अंकोली ता. मोहोळ जि. सोलापूर, ०९) बाळू काशीनाथ गायकवाड वय ५० वर्षे व्यवसाय शेती रा. अंकोली ता. मोहोळ, जि. सोलापूर १०) तानाजी सोमन्ना दुधभाते वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ११) खिरालिंग लाडप्पा माने वय ६१ वर्षे व्यवसाय मजुरी रा. तांदुळवाडी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर १२) बिरु बाबुराव घोडके वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. चिवरी उमरगा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद १३) मल्लिकार्जुन गडप्पा पुजारी वय ३७ वर्षे व्यवसाय शेती रा.मनपुर ता. अफजलपूर जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक, १४) मल्लीनाथ निलप्पा पटणे वय ४५ वर्षे व्यवसाय शेती रा. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, १५) बाळु रतु चव्हाण वय-३५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. चुना भट्टी जवळ, मुळेगांव तांडा, सोलापूर १६) युवराज मारुती राजमाने वय ५९ वर्षे व्यवसाय शेती रा.घर नंबर २३५ मल्लीकार्जुन नगर हत्तुरे वस्ती, सोलापूर, १७) शंकरलिंग संमुक्कप्पा निंबर्गी वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा. गोरबी ता. अफझलपूर जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक, १८) रावसाहेब पांडुरंग साठे वय-३३ वर्षे व्यवसाय शेती रा.बठाण ता. मंगळवेढा, जि. सोलापूर १९) संभाजी प्रभाकर बाबर वय-२९ वर्षे व्यवसाय-शेती रा. बठाण ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हे ५२ पत्त्यांचे पानावर पैज लावुन अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले.

तसेच तेथे माजी आमदार श्री रविकांत पाटील यांचे हस्तक नामे १) अजित उमाकांत पाटील वय ३३ वर्षे व्यवसाय मॅनेजर रा.मुस्ती ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर २) नागनाथ षडाक्षरी भडंगे वय ४९ वर्षे व्यवसाय शेती, रा.मु.पो.तांदुळवाडी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ३) सुनिल ब्रम्हानंद कळके, वय ४० वर्षे व्यवसाय शेती रा.मु. पो. मुस्ती ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर व ४) गीरमल्ला बंडेप्पा गंगोंडा वय ४८ वर्षे व्यवसाय शेती रा. नागणसुर ता. अक्कलकोट जि. सोलापूर ५) शिवानंद चनबसप्पा स्वामी वय-३८ वर्षे व्यवसाय हॉटेल नाईन रेस्ट्रो येथे सुपरवायझर रा. प्लॉट नंबर ८, स्वामी विवेकानंद नगर, होटगी रोड, सोलापूर, ६) रेवणसिध्द शिवराय बुक्कानुरे वय ४८ वर्षे व्यवसाय शेती, रा. रेवण सिध्देश्वर नगर, विजापूर रोड, सोलापूर, ७) संगमेश्वर धर्मन्ना बमगोंडे वय ६० वर्षे व्यवसाय शेती रा. जेऊर ता. अक्कलकोट जि. सोलापूर व ८) आकाश मारुती माने वय-२३ वर्षे व्यवसाय बांधकाम कॉन्ट्रक्टर रा.मु. पो. मुस्ती ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर ९) शांतप्पा शिवशरण बोरूटे वय ३६ वर्षे व्यवसाय केटरर्स, रा. १११ कल्याण नगर, भाग-२, सोलापूर हे जुगार खेळण्यास आलेल्या लोकांना इमारतीमध्ये सोयी सुविधा पुरवित असताना मिळुन आले.

कारवाईमध्ये जुगार खेळण्यास आलेल्या इसमांकडुन २,२४,५४०/- रु. रोख रक्कम, ४,१९,५००/-रु. किंमतीचे मोबाईल फोन, व रु. १३०००/- किंमतीचे जुगाराचे साहित्य असे एकुण ६,५७,०४०/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून विजापूर नाका पो.स्टे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी हरिश बैजल सो पोलीस आयुक्त श्री. बापू बांगर पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. संजय साळुंखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नंदकिशोर सोळुंके, श्रीनाथ महाडीक, पोलीस अंमलदार पोह दिलीप नागटिळक, अशोक लोखंडे, संतोष फुटाणे, अंकुश भोसले, अमित रावडे, राजू चव्हाण, शितल शिवशरण, विनायक बर्डे, कृष्णात कोळी, विद्यासागर मोहीते, विजयकुमार वाळके, संदिप जावळे, सुहास अर्जुन कुमार शेळके, रत्ना सोनवणे यांनी केली आहे.

बावन्न पत्त्यांच्या जुगारात पैसे ऐवजी कॉइन –

हॉटेल मध्ये सुरू असलेल्या जुगारमध्ये पैसे ऐवजी कॉइनचा वापर केला जात होता. पैसे काउंटरवर भरून त्याऐवजी कॉइन घेतले जात होते. जुगार मध्ये या कॉइनचा वापर केला जात होता. दहा रुपयांपासून पाचशे रुपये पर्यंतचे कॉइन या ठिकाणी आढळून आले आहेत. पोलिसांनी पाच हजार रुपये किंमतीचे coin जप्त केले आहेत.

पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणार्‍या तब्बल 29 जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *