MH 13 News Network
गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्व संचालक मधून गुळवंची गावचे सुपुत्र धनाजी सुभाष भोसले-पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी उज्वला दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली.
यावेळी गुळवंची गावचे सरपंच विष्णू दादा भोसले-पाटील उपसरपंच सागर राठोड माझी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब भोसले कुमार नवगिरे संतोष कवडे माजी उपसरपंच पांडुरंग नवगिरे आणि गुळवंची गावातील नागरिक पालक उपस्थित होते. शासन निर्णयाच्या परिपत्रकानुसार शालेय व्यवस्थापन समिती नविन गठित करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समिती संचालक मंडळ पुढीलप्रमाणे –
रेखा अण्णासाहेब गडदे.
शहाजी किसन बोराडे.
अनुजा रविकिरण नवगिरे.
राणी विष्णू रुपनर.
अण्णासाहेब उत्तम काळे.
समीना सैपन शेख.
लक्ष्मी मोहन बोराडे.
आप्पासाहेब बलभीम कोरके.
दिलीप गणपत राठोड.
रेणुका दत्तात्रय कोरके.
धनाजी नानासाहेब भोसले.
गुळवंची जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर,
सौ.पोळ,आगाजे,सुतार,शिंदे,सालसकर,शिवापुरकर,बडूरे उपस्थित होते.