Vaccine लसवंत | सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबिर

 

सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबिर…
पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली मशीदला भेट…

सोलापूर– कोरोनामहामारी च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे.


सोलापूर शहरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.. शहरातील तेलंगी पच्चा पेठ येथील जेलरोड परिसरात असलेले… नूरे इस्लामी मस्जिद ट्रस्ट च्या वतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मुस्लिम समाजामध्ये लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरल्यामुळे लस घेण्यासाठी लोक पुढे येत नव्हते परंतु पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिर आयोजन करण्यामध्ये मशिदीचे मौलवी, ट्रस्टी त्या प्रभागातील नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महानगरपालिकेने मशिदीमध्ये आयोजित केलेल्या शिबिरास 400 लोकांनी लस घेतली असून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली तसेच यामुळे लसीकरणाची गती सुद्धा वाढली आहे. तसेच मशिदीचे मौलवी यांनी मुस्लीम समाजाला लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही या वेळी केले.

त्याचबरोबर सोलापूर शहरांमध्ये बोगस लसीकरण झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली

.यावेळी मुस्लिम धर्मगुरू, मौलवी व नगरसेवक आणि सोलापूर महानगरपालिका यांनी लसीकरणाबाबत पुढाकार घेऊन समाजात जनजागृती केली.या शिबिरस परिसरातील नागरिकांनी उस्पुर्त प्रतिसाद दाखवत लसीकरण शिबिरामध्ये भाग घेतला यामध्ये विशेष म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सदिच्छा भेट देऊन शिबिराची पाहणी केली.

नूर ए इस्लामी मज्जित ट्रस्ट च्या वतीने उपायुक्त धनराज पांडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून. प्रभाग क्रमांक 14 ड चे नगरसेवक रियाज खरादी, तसेच मज्जिद चे इमाम तसेच ट्रस्टी, व परिसरातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.