मोहोळ | दुचाकी-कार अपघात, एक ठार

Big9news Network

माेहोळ तालुक्यातील अनगरच्या जनावरांच्या बाजारातून शेळ्या खरेदी करून दुचाकीवरून निघालेल्या व्यापाऱ्याला पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता यावली गावच्या हद्दीत अनगर पाटी वळणावर घडली. यासीन बाबूलाल कमलीवाले असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार –

सोलापूर येथील जवाहर नगरमधील शेळ्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे यासीन बाबूलाल कमलीवाले (वय २४) शनिवार, २५ डिसेंबर रोजी शेळ्या खरेदी, विक्रीसाठी अनगर गावच्या आठवडा बाजारात भाऊ मोसीन कमलीवाले व इतर सहकाऱ्यांसह आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास परत सोलापूरकडे दुचाकीवरून (एमएच १३ डीके ५६४३) परत जात असताना यावली शिवारात सोलापूर-पुणे महामार्गावरील वळणावर अनगर फाट्यावर कारने (आरजे १४ यूएफ ६९३७) दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात यासीन बाबूलाल कमलीवाले यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दोन पुरुष व १ महिला जखमी झाले. मोसीन कमलीवाले यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.