श्रीसिद्धेश्वर यात्रा झालीच पाहिजे; बंधने चालतील पण बंद चालणार नाही

Big9news Network

भारतीय जनता पार्टीच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काही दिवसातच श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. या यात्रेला ९५० वर्षांची परंपरा आहे व ती अखंड चालत आलेली आहे. कोरोना काळामध्ये यात्रेला खंड पडला.

यावर्षी समस्त भाविकांची व सोलापूरकरांची इच्छा आहे की यात्रा झालीच पाहिजे. त्यामुळे यावर्षी कुठल्याही परिस्थितीत यात्रा झालीच पाहिजे. कोरोनाच्या बाबतीतले सर्व नियम पाळू सगळ्या प्रतिबंधात्मक उपायांची काळजी घेऊन यात्रा पार पडली पाहिजे. आम्हाला बंधन सहन होतील परंतु बंद सहन होणार नाही.

राज्य शासनाने नियमावली तयारी करावी.नियमांच्या आधीन राहून यात्रा पाडावी अशी मागणी आध्यत्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले यांनी बोलताना केली.

यावेळी आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष मनोज हिरेहब्बू, सभागृहनेते नगरसेवक शिवानंद पाटील, सरचिटणीस शशी थोरात, माजी सभागृहनेते नगरसेवक श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरूड, आनंद भंडारी आदीजन उपस्थित होते.