Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big9news Network

समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या ईश्वराला पुजतच असतो. परंतु प्रत्यक्ष ईश्वर, साधुसंत आणि महापुरुषांनी माणसामध्येच ईश्वर पाहण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यामुळे समाजातील व्यक्तीची सेवा ही ईश्वरसेवा ठरते असे प्रतिपादन होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.

वीरशैव व्हिजनतर्फे काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी महापौर शोभा बनशेट्टी, सिद्धेश्वर बँकेचे व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभीरे, वीरशैव सभेचे प्रांतिक सदस्य महेश अंदेली, सामाजिक कार्यकर्ते संगमेश खंडाळे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते.

यावेळी श्री काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या उत्तराधिकारीपदी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची निवड केल्यामुळे त्यांचा महावस्त्र, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

प्रारंभी राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी नरेंद्र गंभीरे म्हणाले की कोविडच्या काळात अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशांना आधार देण्याची गरज आहे. आधार मिळाला की व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकते. त्याकरिता वीरशैव व्हीजनसारख्या संस्थांची गरज आज समाजाला आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सल्लागार चिदानंद मुस्तारे, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, दिपक पौळ, विश्वनाथ मंगरुळे आदी उपस्थित होते.

वीरशैव व्हिजनच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, शोभा बनशेट्टी, महेश अंदेली, नरेंद्र गंभीरे, संगमेश खंडाळे, राजशेखर बुरकुले,आनंद दुलंगे, चिदानंद मुस्तारे, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी, विश्वनाथ मंगरुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *