Big9news Network
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष नामदार श्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते त्यातून लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सुरूवात करावी याकरिता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गणेश ननवरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते समवेत विठ्ठल रुक्मिणीस साकडे घातले.
आज शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत नेते म्हणून राज्यात नावलौकिक आहे, जनतेमध्ये त्यांची कामाचा माणूस म्हणून चांगली ओळख आहे. त्यामुळे अशा या जनसेवा करणार्या नेत्याला कोरोना आजारातून लवकर बरे कर अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्यात आली.
या अभिषेका वेळी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस व पंढरपूर तालुका परीट धोबी सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री गणेश ननवरे, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री राकेश सांळुखे, पंढरपूर शहर परीट समाज शहर अध्यक्ष श्री रामेश्वर साळुंखे, विशाल पवार, ओंकार धुमाळ, सुनील भोसले, राहुल ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply