युवा नेते आसिफ शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Big9news Network

फॉरेस्ट भागातील युवा कार्यकर्ते, संघटक आसिफ मोहम्मद शेख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते.

काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष धर्मा भोसले यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसच्या विविध प्रभागातील उमेदवारांसाठी निवडणुकांमध्ये कार्य केले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता फॉरेस्ट येथील निवासस्थानापासून निघणार असून मोदी मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आसिफ शेख यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी ,दोन मुलं, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. फॉरेस्ट भागातील युवा संघटकाच्या अकाली निधनान ज्या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.