उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Big9news Network

सोलापुरातील बुधवार पेठ येथे पायी रस्ता ओलांडताना उसाच्या ट्रॅक्टरची धडक लागून ट्रॅक्टर खाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विजय रामचंद्र साबळे वय २८ (राहणार – जय मल्हार चौक,बुधवार पेठ) असे त्या तरुणाचे नाव आहे.

पायी चालत जात असताना ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली त्यामुळे विजय यास बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकी येथे झाली आहे.

सदर ट्रॅक्टर चालकास फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे परिसरातील वातावरणात तणाव पसरला होता.