Big9news Network
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळा, त्यांच्या इमारती आणि मैदान भाड्याने देण्यासाठी टेंडर निघाले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने मनपाच्या बंद पडलेल्या नऊ शाळा 29 वर्षे 11 महिने या कालावधीकरिता भाडेतत्त्वावर देण्यासाठी इ निविदा प्रसिद्ध केलेली आहे. सदरची इ निविदा www.mahatenders.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर बघण्यास उपलब्ध आहे. सदर इ निविदा भरण्याचा कालावधी 27 जानेवारी पर्यंत आहे.
या निविदेकरिता प्री-बीड बैठक मंगळवार,दि. 18-01-2022 रोजी सकाळी 11.30 वाजता आयुक्त यांच्या कक्षात आयोजित केलेली आहे. निविदेबाबत अधिक माहितीसाठी भूमी मालमत्ता विभागाशी कार्यालयीन वेळ मध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
कारभारी असणारे नगरसेवक, शासकीय अधिकारी यांनी या शाळेच्या जागेवर नवीन एखादा उपक्रम राबविल्यास कवडीमोल दराने मोक्याच्या जागा घशात जाणार नाहीत. शाळा भाड्याने देण्याचे दुर्दैवी काम महापालिकेने करू नये याबाबत सुजाण नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
Leave a Reply