पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांची मागणी…वाचा सविस्तर

Big9news Network

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या #कोविड आढावा बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील विविध मुद्यांबाबत माहिती दिली. कोविड प्रतिबंधात्मक #कोव्हॅक्सिन लसीच्या ४० लाख तर कोविशिल्ड लसीच्या ५० लाख मात्रांची केंद्र शासनाकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांचे लसीकरण व वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत असल्याने वाढीव लसीच्या पुरवठ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागणी केली. डेल्टा व्हेरियंट आजही प्रभावी असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे उपचारांच्या आज्ञावलीबाबत (प्रोटोकॉल) अत्यंत सुस्पष्टता असावी.

होम किट्स आणि रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची माहिती मिळत नाही. ही बाब केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली. त्याबाबत नोंद ठेवावी. अशा रुग्णांना फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी करता येईल, अशी सूचनाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली