Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ.अनिल अवचट यांचे पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. संवेदनशील लेखक,साहित्यक, पत्रकार सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. साहित्य आणि वैद्यक क्षेत्रात त्यांनी खूप मोठे काम केले.
    अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे ते आदर्श स्थानी होते.व्यसनमुक्तीवर त्यांनी खूप मोठे कार्य उभे केले.डॉ अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
    पत्रकार नगरात दुपारी दोन पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुक्तांगण च्या माध्यमातून व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी खूप मोठा लढा उभारला होता. राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

 

मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले.
त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *