मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Deo) यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajikya Deo) यांनी याबाबत माहिती दिली आहे. हिंदी, मराठी अशा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिका बजावल्या. रमेश देव सीमा देव ही जोडी रूपेरी पडद्यावर खूप मोठ्या प्रमाणावर गाजली. एक यशस्वी जोडपे म्हणून चित्रपट सृष्टीत देव दाम्पत्य ओळखलं जात होतं.
30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. (Veteran Actor Ramesh Deo Passes Away)