Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ५१ शिवजयंती मंडळांना सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती खड्डा तालीमचे संस्थापक अध्यक्ष आणि नगरसेवक सुनिल कामाठी यांनी दिली.

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट १४ वे वंशज सिद्धार्थ कंक यांच्या हस्ते मंडळांना मूर्तींचे वाटप होणार आहे. तर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

खड्डा तालीमतर्फे आजवर ५०० हून अधिक श्री शिवजन्मोत्सव मंडळांना ६ फूट उंच आणि ५ फूट रुंद मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. अनेक श्री शिवजन्मोत्सव मंडळांना भव्य उत्सव करण्याची इच्छा असूनही मूर्ती अभावी करता येत नाही. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून मूर्ती मंडळांना देण्यात येत आहेत, असेही श्री. कामाठी म्हणाले. या मूर्ती वाटप कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सोलापूरकरांना घडणार सरसेनापती येसाजी कंकांच्या तलवारीचे दर्शन

स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक यांनी विविध युद्धात वापरलेली तलवार कंक घराण्याने जतन करून ठेवली आहे. ही तलवार सोलापूरकरांना दर्शनासाठी या कार्यक्रमावेळी ठेवण्यात येणार आहे, असेही नगरसेवक सुनील कामाठी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *