Big9news Network
सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे भाजपच्या आमदार तसेच नेत्यांविरुद्ध वायफळ बडबड करत आहेत त्यांनी ही बडबड बंद करावी, पक्षानेही सुरेश पाटलांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असा टोमणा उपमहापौर राजेश काळे यांनी लगावला आहे.
राजेश काळे म्हणाले की, सुरेश पाटील स्वतःला पक्षा पेक्षा मोठे समजत आहे भाजपच्या 49 नगरसेवकांपैकी सर्वात वाह्यात नगरसेवक म्हणजे सुरेश पाटील आहेत. त्यांना पक्षाने विरोधी पक्ष नेता सभागृहनेता अशी मोठी पदे दिली. याचा विचार त्यांनी करावा आणि खाल्ल्या मीठाला जागावे. गेल्या काही वर्षांपासून सुरेश पाटील हे पक्षातील नेत्यांवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी एका महापौरांवर विष प्रयोगाचा आरोप केला आहे परत दुसऱ्या महापौरांकडे 20 टक्क्यासाठी बाटली फेकून मारली आहे. असे अनेक प्रकार सुरेश पाटील यांनी केलेले आहेत शहर उत्तर मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते निवडून आले आहे.त सुरेश पाटील यांनी आपण कोण आहोत याचा विचार करावा. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही त्यांना पाठीशी घालू नये, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. सुरेश पाटील स्थायी समिती सभापती असताना हे पद वादाच्या भोवऱ्यात अडकवले, झोन समित्याही झाल्या नाहीत. या सर्व गोष्टीचा आता पक्षाने विचार करावा यापुढे पाटलांना पक्षाने संधी देऊ नये असेही काळे यांनी म्हटले आहे.
आता दूध का दूध पानी का पानी करणार –
मी लवकरच परत येणार असून सर्वांसमोर दूध का दूध आणि पानी का पानी करणार आहे प्रदेशाध्यक्षांनी यांच्यासमोर काय खरे आणि काय खोटे आहे हे सांगणार आहे, असे राजेश काळे यांनी म्हटले आहे.