Big9news Network
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झीट जवळ सहा वाहनांचा अपघात चार ठार तर तीन किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वर खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना सहा वाहनांचा अपघात होऊन सोलापुर जिल्ह्यातील तिघे तरुण तर तुळजापुर येथील एक तरुण जागीच ठार तर जालना जिल्हातील तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पहाटे च्या सुमारास एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झीट जवळ मुंबई कडे जाताना MH 46 AR 3877 या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर ने पुढे जाणा-या MH13 BN 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली. (यातील चार प्रवासी मयत) स्वीफ्ट कार ने MH 10 AW 7611 या पुढे जाणा-या आयशर टेम्पो धडक दिली. टेम्पो ने पुढे जाणा-या MH 21 BO 5281 या पुढील कारला जोरदार धडक दिली. (या कार मधील तीन प्रवासी रा. जालना किरकोळ जखमी). वेन्यु कार ने पुढे जाणा-या कंटेनर MH 46 BM 5254 ला जोरदार धडक दिली. मात्र या कंटेनर चालक मात्र निघून गेला.
या अपघातात स्वीफ्ट कार मधील काँग्रेस पक्षाचे नेते गौरव गौतम खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ मल्लीक राजगुरु, जि. सोलापुर व मयुर दयानंद कदम रा. तुळजापुर हे जागीच ठार झाले तर पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघे ही रा. जालना, वेन्यु कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर अपघाताची माहीती कळताच आय आर बी यंत्रणा, महामार्ग वाहतुक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स घटनास्थळी पोहचुन मदतकार्य सुरु केले. अपघातग्रस्त दोन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला करुन मार्ग मोकळा केला.