डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील, संशोधन अधिकारी जात पडताळणी विभाग सचिन कवले, विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर समाज कल्याण कार्यालयामार्फत साजरा करण्यात येत असलेल्या सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले.
विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
निबंध स्पर्धा (मराठी )संगमेश्वर कॉलेज,सोलापूर:- ज्योती वाघमारे (प्रथम), अस्मिता बिराजदार (व्दितीय), मल्लिनाथ बिराजदार (तृतीय) . निबंध स्पर्धा (इंग्रजी) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर :- पूजा दलवाई (प्रथम), उमेश बिराजदार (व्दितीय), मस्कान खान (तृतीय). निबंध स्पर्धा (कन्नड) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर :- वैशाली हौशेट्टी (प्रथम), राजेश्वरी चनबसय्या कौटगी (व्दितीय). निबंध स्पर्धा (हिंदी) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर :- अश्विनी बेंडगे (प्रथम), ज्योती इंगळे (व्दितीय), सुमन शर्मा (तृतीय), अंकिता वाघमारे (उत्तेजनार्थ), वैष्णवी घाटे (उत्तेजनार्थ). निबंध स्पर्धा, वालचंद कॉलेज, सोलापूर :- प्रियंका मुंडासे (प्रथम), विजया कदम (व्दितीय),नंदिनी पाटील (तृतीय). निबंध स्पर्धा, भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय, सोलापूर :- वैशाली कोळेकर (प्रथम), सोपान सुरवसे (व्दितीय), अंकीता लोकरे (तृतीय). वक्तृत्व स्पर्धा, भारती विद्यापीठ समाजकार्य महाविद्यालय, सोलापूर :- शुभम मिसाळ (प्रथम), प्रदीप झोंबाडे (व्दितीय), स्नेहल अंबीगर (तृतीय). निबंध स्पर्धा, भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय, सोलापूर :- अंकिता लोकरे (प्रथम), हृतिक कुर्ले (व्दितीय), उर्मिला बनसोडे (तृतीय) .
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार अमरदीप वाकडे, नायब तहसिलदार आर.व्ही. पुदाले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी विजयकुमार लोंढे, सलीम शेख, महेश निलंगे, विनायक कुलकर्णी, संदीप माने, जे.डी.पवार, विनय वाले, कट्टीमनी, सगर आदी उपस्थित होते.