सोलापुरात पुन्हा एकदा हप्ता म्हणून लाच घेणाऱ्या एका व्यक्तीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे
तब्बल बत्तीस हजार रुपये रकमेचा पहिला हप्ता घेताना त्यास जेरबंद करण्यात आले.
फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला असे त्या व्यक्तीचे नाव असून सहाय्यक विद्युत निरीक्षक या पदावर तो कार्यरत आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की..
यातील तक्रारदार यांनी कंत्राट पध्दतीने इलेक्ट्रीकलची कामे घेण्याकरीता नवीन फर्म सुरु केली होती .
त्यासाठी काही परवान्याची आवश्यकता होती. यामध्ये विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरीता विद्युत निरीक्षक विभाग, सोलापुर येथे त्यांनी अर्ज केला होता.
तक्रारदार यांना विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळाला आहे. विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरीता ते सातत्याने पाठपुरावा करीत होते.
असता यातील संशयित आरोपी मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे यापुर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षीस म्हणुन १० हजार रुपये व सध्याचे ठेकेदार परवान्याचे २२ हजार रुपये असे मिळून ३२हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता १५ हजार रुपये स्विकारले असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील कार्यवाही करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात मार्फत करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे विद्युत वितरण विभागात खळबळ माजली होती.