अमोल मिटकरी यांनी सांगली येथील सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन
अमोल मिटकरी यांनी सांगली येथील सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्याने राजकीय वातावरण तापलं .दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. मी केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रणित संघटनांनी विपर्यास केलाय.
त्या लोकांना माझे आव्हान..
राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करत आहेत. माझ्या पक्षाची ती शिकवण नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता असून जी लोक आज मी माफी मागावी म्हणत आहे त्या लोकांना माझे आव्हान आहे.
राजा शिवछत्रपती या कादंबरीत जी बदनामी झाली आणि याचा पुरस्कार करणारे वातावरण सध्या महाराष्ट्र मध्ये आहे. पुरंदरे यांनी लिहिलेल्या या कादंबरीबद्दल माफी मागावी, राज्यपाल कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल जे विधान केले त्या बद्दल माफी मागावी तरच मी मागण्यास तयार असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथील जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर पुण्यात ब्राम्हण महासभेने आंदोलनाचा पवित्रा घेत मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकरणी मिटकरी यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल करा, अशी तक्रार परशुराम सेवा संघातर्फे वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांचा खुलासा
अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्याने राजकीय वातावरण तापलं असून त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. ते माझ्या व्यसपीठावरुन बोलल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.