Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्याबद्दल आ. अमोल मेटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दखल करावा अशी मागणी सोलापूरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली .


मारुती स्तोत्रचे म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हणून दाखवत सगळ्याची फसवणूक केली तसेच कन्यादानच्या विधीची चेष्टा करत समस्त पुरोहित वर्गाला लज्जा वाटेल असे विधान करत मेटकरी यांनी समाजाची बदनामी केली. यामुळे सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जयंत फडके गुरुजी व ब्राह्मण समाजाचे नेते प्रा. काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेउन गुन्हा दाखल करण्या विषयी निवेदन दिले. जर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला.

यावेळी वेद प्रतिष्ठानने पुढाकार घेत गुन्हा दाखल करण्याविषयी आग्रही भूमिका घेतली. यावेळी प्रसाद देशमुख , वैभव कामतकर , अनिरुध्द जोशी , राजाभाऊ कुलकर्णी , रंगनाथ उपाध्ये , हनुमंत हुंडेकरी , किरण उपाध्ये , आनंद हुंडेकरे , दिपक कुलकर्णी , किरण कुलकर्णी , हर्षल जोशी , राजु निंबर्गी , उमेश काशीकर , पंकज कुलकर्णी , अभिजीत तेरकर , आनंद तेरकर , प्रसाद पैठणकर , सौ संपदा जोशी , प्रल्हाद देशमुख , सुमीत कुलकर्णी , बजरंग कुलकर्णी , विक्रम डोनसळे , राहुल उपाध्ये , सचिन वेणेगुरकर , निशिकांत खेडकर , यांच्या सह वेद प्रतिष्ठान , ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान , ब्राह्मण महासंघ , अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *