- अमृत महोत्सवी अभिषेकासाठी होणार वटवृक्ष मंदिर आडातील जलाचा वापर
- आडातील जल चेअरमन महेश इंगळेंनी केले सुपूर्द
(प्रतिनिधी अक्कलकोट} पुण्यातील धनकवडी स्थित सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधी अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शंकर महाराज मठाचे विश्वस्त प्रताप्राव भोसले यांनी सर्वप्रथम आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली.
शंकर महाराजांच्या समाधी दिनी पुण्यातील समाधी मठात त्यांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. या अभिषेक महोत्सवात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या आडातील जलाचा वापर होणार आहे. आज या मठातील आडाचे जल मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार पुजारी यांनी विधिवत पूजन करून महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी त्यांचे सहकारी आशिष महादळकर, अमेय खाडिलकर, भरत बिरादार, महादेव खराडे, गणेश मावडीकर तसेच वटवृक्ष मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, संजय पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, नागनाथ गुंजले, मनोज काळे, मनोज जाधव इत्यादी उपस्थित होते.