सोलापूर दि.21- येथील भगिनी समाज हॉल चार पुतळा येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी भगिनी समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी अर्चना बिडकर व सचिव पदी सुलभा रहाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेत मांडण्यात आलेल्या जमाखर्च व ताळेबंद ताळेबंदास सभासदांनी मान्यता दिली. बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता संस्थेच्या कार्यालयात चैमोत्सव व वसंतोत्सव साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष बिडकर यांनी केले.
संस्थेचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे..
उपाध्यक्ष विजय मम्हाणे,सहसचिव अंजली हिंगे, खजिनदार संध्या गोवर्धन, कार्यकारी सदस्य अर्चना पवार, आरती कुसुगल, रश्मी माशाळकर, आरती नाशिककर, स्वाती साळुंखे, किरण अंकुशकर,
सल्लागार उषा शहा, अंजलीनानल, निर्मला कणगी, स्मिता मडकी व विद्या मणुरे.