सोलापूर–सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात सीएनजीवरील 10 नव्या घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रदूषण टाळण्याबरोबर इंधनावरील आर्थिक बचत होणार आहे अशी माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागाचा डीपीआर पाठविला होता. त्या अंतर्गत साडेतीन कोटी रुपये प्राप्त झाले. यामधून 35 सीएनजी वरील घंटागाड्या घेण्यात आल्या. आणखी सहा घंटागाड्याची मागणी केली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी व इंधनावरील खर्च कमी करण्याकरिता एकूण 41 सीएनजी घंटागाड्या घेण्यात येणार आहे. त्यापैकी 10 नव्या घंटागाड्या पालिकेत दाखल झाल्या आहेत.सीएनजी वरील घंटागाड्या मुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, वाहन विभाग प्रमुख पुकाळे, मेनकुदले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.