Latest Post

hello world Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino

मुंबई : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान आणि राजद्रोहाचा आरोपाखाली अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा  दांपत्याला  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यानंतर राणा  दांपत्याने  तत्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, कोर्टाने २९ एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी ठेवली आहे.  उद्या नियमित न्यायालयात जामीन अर्ज केला जाणार आहे.

पोलिसांनी राणा दांपत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत, याची माहिती न्यायालयाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा  दांपत्याच्या पोलीस कोठडीला विरोध केला. राणा  दांपत्यावर खार पोलीस ठाण्यात १५३ (अ) आणि १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल २० मिनिटे हा युक्तिवाद सुरू होता. नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना ऑर्थर रोड तुरुंगात पाठवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *