आषाढी वारी बंदोबस्तात स्थानिक गुन्हे सोलापूर ग्रामीण पथकाची चमकदार कामगिरी
श्री. क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भावीक येत असतात.
सदर आषाढी एकादशी साठी श्री. ज्ञानेश्वर माउली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो भावीक पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. सदर भावीकांच्या गर्दीमध्ये काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक देखील सामील होवून भावीकांच्या पैसे, मोबाईल, किंमती वस्तू यांच्या चोरी करण्याच्या उद्देशाने येतात, अशा दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून भावीकांना त्रास होवू नये, त्यांच्यामालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे श्री. सुहास जगताप, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त नेमला होता. हौसे ,नवसे, गवसे यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते.
श्री. सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर गामीण यांनी सदर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री. नागनाथ खुणे, सपोनि श्री. अनिल सनगल्ले, सपोनि व श्री. शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासमवेत स्थानिक गुन्हे शाखेतील गुन्हेगारांची माहिती असणारे पुरुष व महिला अंमलदार यांची पथके तयार करून बंदोबस्त लावला होता.
तिन्ही पथकासमवेत पोनि जगताप यांनी पुणे जिल्ह्यातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा आगमन ठिकाणाहून बंदोबस्त तैनात केला होता. सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेश पालटून व साध्या कपड्यामध्ये गर्दीमधील चोरट्यावर लक्ष देवून वारकरांचे साहीत्य उचकटनारे लोकांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे
पथक प्रमुखाचे नाव सपोनि नागनाथ खुणे यांनी तब्बल 46 जणांवर कारवाई केल्या. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी 13 तर पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी 18 कारवाया केल्या. आषाढी वारीमध्ये तब्बल 75 कारवाया करून वारीमध्ये शांतता निर्माण करण्याचे कार्य केले.
त्याचप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाने पंढरपर येथे आषाढी वारीच्या दिवशी दोन इसमांकडे चोरीचा संशयीत माल असल्याची माहिती मिळालेवरून त्यांना ताब्यत घेवून सविस्तर तपास करता त्यांचेकडून ५७,७००/- रूपये किंमतीचे मोबाईल व इतर साहीत्य जप्त केले असून सदरचे साहीत्य पंढरपूर शहर येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे, सपोनि अनिल सनगल्ले, पोउपनि शैलेश खेडकर, सहा. फौ. शिवाजी घोळवे, बीराजी पारेकर, राजेश गायकवाड, मनोहर माने, विजया मोहीते, पोह सर्जेराव बोबडे, प्रकाश कारटकर आबासाहेब मुंढे, बापू शिंदे, धनाजी गाडे, प्रमोद माने, मोहीनी भोगे, धोंडाबाई म्हेत्रे, पोना गणेश बांगर, धनराज गायकवाड, लाला राठोड, नितीनकुमार चव्हाण, ज्योती काळे, अनिसा पटेल, पोकों अक्षय दळवी, अनिस शेख, अजय वाघमारे, राजेंद्र गव्हेकर, राम बॉबलीवार, सुनंदा झळके, सुमया तांबोळी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे.