सोलापूर : शिस्तबद्ध राजकीय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भारतीय जनता पार्टीसाठी मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. सोलापूरचे भाजपचे
जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबतच एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.यामुळं जिल्ह्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर तापले आहे.
दरम्यान, श्रीकांत देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेविरोधात मुंबईमध्ये हनीट्रॅपची केस दाखल केली होती. त्यानंतर हा व्हिडिओ आज मंगळवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे.
आज मंगळवारी ‘त्या’च महिलेने आपला बेडरूम मधील व्हिडिओ स्वतःहून व्हायरल केला आहे. त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे दिसून येत आहेत. नुकतेच त्यांचे भांडण झाल्याचे दिसून येत असून संतापलेल्या महिलेने लाईव्ह व्हिडिओ व्हायरल केला आहे.
या व्हिडिओमुळे श्रीकांत देशमुख यांची अडचण वाढणार असून आता भारतीय जनता पार्टी याबाबत काय निर्णय घेणार या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.