- Big9 News
सोलापूर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.गोविंद काळे, प्रा.संजीव सोनवणे व लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता तसेच सगर व गवंडी या जातीसंदर्भात स्थळपाहणी करिता दि. 1 ते 3 मार्च 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता खाजगी वाहनाने सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
02 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील सगर व गवंडी या जातसमूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी . दुपारी 1.00 ते 2.00 भोजन. दुपारी 2.00 वाजता सोलापूर येथून पंढरपूरकडे रवाना. दुपारी 3.30 ते 5.30 पंढरपूर शहरातील सगर व गवंडी या जातसमूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी. रात्री पंढरपूर येथे मुक्काम. शुक्रवार दिनांक 03 मार्च 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता पुणेकडे रवाना.