Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

 

Big9 News

     भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेकडून जाहिर मंगळवेढा – भारत सरकारच्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या तर्फे देण्यात येणारा “राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- २०२३” हा पुरस्कार महा अॉरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे (मंगळवेढा जि, सोलापूर) यांना जाहिर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. यापूर्वी ही पडवळे यांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध स्वयंसेवी संस्था कडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.           पडवळे हे गटशेती, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन व सहकार्य करित असतात. तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ते केंद्र व राज्य सरकार यांच्या कडे अभ्यासपूर्ण पणे मांडतात.

त्यांच्या या कामाचीच दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहिर केला आहे. सदर पुरस्कार पुसा संस्थेच्या मेळावा ग्राऊंड वर दि. २ ते ४ मार्च दरम्यान होणाऱ्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात दि, ४ मार्च ला केंद्रीय कृषीमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय कृषी राज्यमंत्री ना, कैलाश चौधरी यांचे हस्ते विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पडवळे यांना जाहिर झालेल्या राष्ट्रीय कृषी पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *