Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर- छञपती शिवाजी महाराज जयंती आणि शहिद अशोक कामटे यांच्या 58 व्या जयंतीचे औचित्य साधून शिवमुर्ती व अशोक कामटे प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.


त्याप्रसंगी आस्था फौंडेशन [आस्था रोटी बँक]चे विजय छंचूरे, शहिद अशोक कामटे विचारमंचचे योगेश कुंदूर, ॐसाई प्रतिष्ठाणचे रुपेश कर्पेकर,अनिल बुर्हाण्डे ,रतन पालकर, छाया गंगणे,संतोष वर्देकर. महेंद्र वाडेकर, विकास कुंदूर. गिरिष विजापूरे. राजू पालकर. . आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती निम्मित्त लायन्स क्लब मार्फत नेञरोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले.तसेच सोलापूर शहरातील 15 गोरगरिबांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले.
त्या प्रसंगी लायन्स हाॕस्पिटलचे RMO डाॕ. शिवाजी पाटील. व्यवस्थापन आधिकारी सौ. रुपा चंद्रकुमार. श्री महासिध्द म्हमाणे. हाॕस्पिटलचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने हे शिबीर यशस्वीपणे पार पडण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना डाॕ. शिवाजी पाटील यांनी
“अशोक कामटे जयंती निमित्त आस्था रोटी बँक व शहिद अशोक कामटे विचारमंचचे उल्लेखनीय असे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. नेत्र शिबिराच्या माध्यमातून वंचित घटकातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविला जातो या कौतुकास्पद कामगिरी बाबत दोन्ही संस्थांबाबत गौरवोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *