Big9News
अकलुजमधील जिल्हा रुग्णालयातील परिसेविका गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त सौ सुरेखा केदारी – सुतार यांना दिल्लीत सन्मानित करुन त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मा.राज्यमंत्री रामदासजी आठवले याचे हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक यांनी लेखी पत्राने कळवली आहे.
सौ.केदारी – सुतार यांना सन 2006 रोजी गुणवंत कर्मचारी हा पुरस्कार देण्यात आला होता .सन 1988 साली आरोग्य खातेत सेवेत रुजू झालेल्या केदारी यानी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात ठीक ठिकाणी आरोग्यसेवेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चुल व मुल,प्रपंच सांभाळून केले .प्रत्येक वेळी दवाखान्यात विविध आजाराने पीड़ित असणारे रुग्णाची सेवा केली त्याच्या प्रामाणिक कामचीही पावतीच होय . प्रत्येक रुग्ण हा औषध गोळ्या पेक्षाही त्यास धीर दिला तर तो लवकर बरा होतो ही केदारी याची मानसिकता सतत असते.
त्यामुळे आरोग्य खाते स्थानिक प्रतिनिधि ही नेहमी कौतुक करीत असतात .त्याचे निवडी बाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री विजय सिंह मोहिते पाटील आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील अकलुज चे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील अकलुज उप जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.