Big9News
जुळे सोलापूरचा अध्यात्मिक विकास करावयाचा असेल तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयासारख्या अध्यात्मिक संस्थेची गरज आहे
त्यांनी आमच्या भागात शाखा सुरू करुन अध्यात्मिक गरज पूर्ण केली आहे. भविष्यात काही अडचणी आल्यास मी सर्वतोपरी मदत करावयास तयार आहे असे उद्गार सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी काढले . जुळे सोलापूर मधील जुने संतोष नगर येथील ब्रह्माकुमारी पाठशाळेत महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी जेष्ठ कवी गोविंद काळे हेही उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या संचालक राजयोगिनी सोमप्रभा , सदिक्षा बहेन , सुजाता बहेन , कीर्ती बहेन तथा प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते शिव ध्वजारोहण करण्यात आले .
कवी गोविंद काळे यांनी आपल्या शानदार शैलीत सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कविता सादर कैली . तसेच मी लवकरच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयासारख्या अध्यात्मिक कार्य करणाऱ्या संस्थेचा नियमित सदस्य बनणार आहे असे मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाल , श्रीफळ , गुच्छ व ईश्वरीय भेट देवून स्वागत करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ब्रह्मा कुमारी पाठशाळेच्या संचालिका ब्र. कु. गिरीजा चव्हाण यांचा सन्मान राजेश काळे व गोविंद काळे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या संचालिका राजयोगिनी सोमप्रभा दिदी यांनी शब्द सुमनांद्वारे सर्वाचे स्वागत केले व महाशिवरात्री चे अध्यात्मिक रहस्य सर्वांना सांगितले .
आपण परमात्म्याच्या आठवणीत राहून स्थूल जागरण न करता निरंतर स्मृतीत ठेवावे हाच खरा महाशिवरात्रीचा उपवास आहे असेही त्या पुढे म्हणाल्या . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेवणिसिध्द , शिवशंकर , . फरिस्ता , गणेश , अमर , आदित्य , . कन्नुरे आदिनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदिक्षा दिदी यांनी केले तर आभार बीके. रेवणसिध्द यांनी मानले.