Big9 News
अक्कलकोट रोड एमआयडीसी अत्याधुनिक अग्निशामक दलासाठी निधी द्यावा: माजी नगरसेवक नागेश वल्याळ
अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी.औद्योगिक वसाहतीत गेल्या १/२ महिन्यात ज्या कारखान्यांना आग लागुन खुप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले,त्यासंदर्भातील नियोजन भवन येथे माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चेंबर ऑफ कॉमर्स आणि उद्योग आघाडी सोबत बैठकीत विस्तारीकरण करण्यासाठी माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या समवेत सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाच्या वतीने , अंबादास बिंगी, उद्योजक अमित जैन ,प्रकाश पवार , नारायण आडकी, श्रीहरी ईराबत्ती, कासवा शेठ ,यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी, तसेच मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी मिळावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. औद्योगिक वसाहतीची स्थापना होऊन शासकीय जमिनीवर उद्योगासाठी प्लॉट वितरित झाले. सध्या लहानमोठे अनेक उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत. वसाहतीला रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, ड्रेनेज इत्यादी सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत. उद्योजकांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे समस्या येत आहेत.
मूलभूत सुविधा द्याव्या
वर्धमान वसाहतीसाठी केंद्रशासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, मूलभूत सुविधा मिळाव्यात एमआयडीसीला निधी देण्याची व अडचण दूर करण्याचीृमागणी केली. पालकमंत्र्यांनी या बैठकीत एमआयडीसी येथील पाणी टाकी परिसरात चार हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिल्यास नवीन अग्निशामक दल जिल्हा नियोजन निधीतून उभे करण्याची ग्वाही व अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांसाठी निधी देण्याचे आश्वासन पालक मंत्र्यांनी दिले.
ही बैठक माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार श्री सुभाष बापू देशमुख, खासदार जय सिद्धेश्वर महाराज, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राजा राऊत, साहेब ,महापालिकेचे आयुक्त शितल तेली मॅडम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब आदी मान्यवर उपस्थितीत पार पडला.