Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

      आईने पाणी भर म्हणून रागवल्याने घरातून गेलेला मुलगा परतला

   

      आईने घरातील पाणी भर असे म्हणत,रागावल्याने रागाच्या भरात घर सोडून गेलेला सतरा वर्षाचा मुलगा परतला तो मुलगा रविवारी रात्री घर सोडून गेला होता, तो बुधवारी सकाळी घरी परतला.

 

      जुळे सोलापुरातील राहणारा एक सतरा वर्षाचा मुलगा सतत मोबाईल गेम खेळण्याने गेमच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो कोणतेच घरातले काम करत नव्हता. यात आईने घरातील पाणी भर असे म्हणत, रागावल्याने मुलाने रागाने मोबाईल फोडून टाकून पळून गेला, त्यानंतर तो आलाच नाही. आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला पण तो काही सापडला नसल्याने,मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली.

     

      त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मुलाचा शोध घेतला मुलाच्या शोधासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पीएसआय ए.एम शेख सायबर चे एपीआय नळेगावकर यांनी विशेष प्रयत्न केले. पळून गेलेला मुलगा हा दुसऱ्या मोबाईल वरून गेम खेळण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याचे लॉगिन होण्यासाठी लागणारा ओटीपी साठी आईचा मोबाईल नंबर येत होता अशी माहिती सायबर पोलिसांनी सांगितली त्यानंतर त्याचा शोध घेतला. असता तो मुलगा घरी आला. आजीने तो मुलगा आल्यानंतर याची माहिती आपल्या मुलाला सांगितली त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलाची भेट घेऊन विचारपूस केली असता,त्यादरम्यान तो खूप आजारी होता, यामुळे त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *