Big9 News
गेल्या महिन्याभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. सध्या कांद्याला सरासरी पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे त्यात शासनाकडून तीनशे रुपये मिळणार आहे त्यामुळे आजही सोलापूर बाजार समितीत 700 ते 800 ट्रक कांद्याचे आवक आहे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते लासलगावच्या कांदा मार्केटला मागे टाकत सोलापूर नी देशात नाव केले आहे त्यामुळे सोलापूर बाजार समितीत वर्षभर कांद्याची आवक असते जानेवारी महिन्यापासून सरासरी 500 ट्रक कांद्याची आवक सुरू आहे जानेवारी महिन्यात सरासरी पंधराशे रुपये पर्यंत दर मिळत होता मागील एक महिन्यात दर कोसळला आहे चांगला का नाही आज 600 ते 700 रुपयांच्या आतच विकला जात आहे सरासरी 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे
यंदा परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे त्यामुळे आता मार्च महिन्यात कांद्याची काढणी सुरू आहे शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये घेऊन येत आहे राज्य शासनाने कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे साधारण एक हजार रुपयांचा दर मिळाला तरीही अनुदानाची रक्कम ही मिळणार आहे त्यामुळे दर तेराशे रुपये पडेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.
त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत. गोलटी, फकटी कांदा सरासरी शंभर ते तीनशे रुपयापर्यंत विकला जात होता मात्र गुरुवारी हा कांदा केवळ 50 ते 150 रुपये क्विंटल विकला गेला आहे आज पन्नास रुपये दर मिळत असला तरी शासनाकडून तीनशे रुपयांचे अनुदान मिळाल्यावर साडेतीनशे रुपये मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे