Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

घरफोडी चोरी करणारा एक अट्टल गुन्हेगार व एक विधीसंघर्ष बालक यांचेकडून 07 घरफोडी चोरी गुन्हयांची उकल करून, 70 ग्रॅम सोन्याचे दागिने, 280 ग्रॅम चांदीसह , 50 हजार रोख रक्कम असा एकूण 4 लाख, 14 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे आदेशान्वये दिनांक 10/03/2023 रोजी बार्शी उपविभागात पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथक पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी हजर असताना, त्यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, माळशिरस तालुक्यातील घरफोडी चोरी इत्यादी विविध गुन्हयांतील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचा साथिदार हा बार्शी येथील कुर्डुवाडी लातूर बायपास लगत असलेल्या अलिपूर गांवच्या शिवारात असणा-या हाॅटेल पवार कोल्ड्रिंक्स जवळ त्याच्या साथिदारासह थांबला असल्याबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने, त्यावरून त्यांनी सदरची बातमी ही वरिश्टांना कळवून तात्काळ वरिश्ठांच्या आदेशानुसार बातमीतील ठिकाणी जावून पाहिले असता बातमीतील वर्णणाप्रमाणे 02 इसम थांबलेले दिसले, त्यांचा बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर पोलीय उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथकाने ताब्यात घेतलेल्या इसमांकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करून चैकशी केली असता, त्यांनी बार्शी भागातील मौजे भोईंजे, अलीपूर रोड, तावडी, खांडवी, गाडेगांव रोड, वाणी प्लाॅट, सुभाश नगर इत्यादी ठिकाणी मागील 1 वर्शापासून त्यांचे इतर साथिदारांसह घरफोडया चो-या केल्याचे सांगून गुन्हयातील मुद्देमाल काढून दिला आहे. त्यावरून सदर आरोपींकडून खालील प्रमाणे 07 घरफोडी चोरी गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.
1) बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 362/2022 भा द वि क. 457,380 प्रमाणे (मौजे भोईंजे )
2) बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 292/2022 भा द वि क. 457,380 प्रमाणे, (मौजे तावडी),
3) बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 397/2022 भा द वि क. 457,380 प्रमाणे,(मौजे खांडवी),
4)बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं.419/2022 भा द वि क. 457,380 प्रमाणे (गाडेगांवरोड बार्शी )
5)बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 651/2022 भा द वि क. 457,380 प्रमाणे (वाणीप्लाॅट बार्शी ),
6) बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 553/2022 भादविक. 457,380 प्रमाणे (अलीपूररोड बार्शी),
7) बार्षी शहर पोलीस ठाणे गु.र.नं.825/2022 भादविक. 457,380 प्रमाणे(झाडबुके मैदान बार्शी)

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. शिरीश सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप, यांचे नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सफौ/ शिवाजी घोळवे, पोहेकाॅ/ बापू शिंदे, मोहन मनसावाले, पोना लालसिंग राठोड, अजय वाघमारे, यश देवकते, सुरज रामगुडे, महिला अंमलदार मोहिनी भोगे, सुनंदा झळके यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *