Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे (वय-३५,रा.हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला आरोपी सुनील आचलारे हा नेहमी आपल्या रिक्षातून ने आण करत होता. यातूनच त्यांची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी सोबत पीडित महिला ही बोलत होती. पीडिता ही आजारी असताना आरोपीच्या रिक्षातून दवाखान्यात गेली. तेव्हा संशयित आरोपीने पीडितेला ज्यूसच्या बॉटलमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर पीडितेला लॉजवर नेऊन अत्याचार केला. पीडिता जेव्हा शुध्दीवर आली तेव्हा विचारल्यानंतर त्याने मी संबंध ठेवून त्यावेळी फोटो काढले आहेत, असे म्हणत पीडितेला ब्लॅकमेलिंग करू लागला. शिवाय तुझे फोटो पतीला दाखवितो, नाहीतर मीच रेल्वे खाली जीव देतो अशी धमकी देऊन त्याने पीडितेशी विविध ठिकाणी जाऊन अत्याचार केले. शिवाय आतापर्यंत त्याने एक लाख रुपये पीडितेकडून विविध प्रकारे घेतले आहेत, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *